नवी दिल्ली | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला चांगला धडा शिकवून जातात तर काही व्हिडीओ आपल्याला खदखदून हसवतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा असाच एक खदखदून हसवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सार्वजनिक मालमत्ता ही वैयक्तिक मालमत्ता समजून त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, असं अनेकवेळा सांगितलं जातं. मात्र, तरी देखील काही लोक या गॊष्टीचं पालन करत नाहीत. अशाच सार्वजनिक स्वच्छतागृहाचा योग्य वापर न करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला वॉश बेसिनमध्ये पाय धुण्याचा प्रयत्न करते. मात्र, हा प्रयत्न करत असताना या महिलेसोबत जे घडलं ते पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला सार्वजनिक स्वच्छतागृहातील वॉश बेसिनमध्ये पाय धूत आहे. एक पाय धुवून झाल्यानंतर ती दुसरा पाय धुण्यासाठी बेसिनमध्ये ठेवते. मात्र, तिचा पाय अडकतो आणि ती बदकन जमिनिवर आदळते.
सुदैवाने या महिलेला गंभीर दुखापत होत नाही. ती दुसऱ्या क्षणाला उठून पुन्हा उभी राहते. तिथेच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे सर्व दृश्य कैद होतं. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजू शकलं नाही. मात्र, अनेक युजर्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने ‘Instant Karma’ असं म्हटलं आहे. तसेच काही युजर्स यावर प्रतिक्रिया देत या महिलेला पब्लिक रुल्स समजवण्याची गरज असल्याचं म्हणत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
झूम मिटिंग सुरू असताना अचानक कॅमेरा सुरू झाला अन् शिक्षकाचं बेडवरील कृत्य सर्वांसमोर आलं
वरुण धवन ठाकरे सरकारवर संतापला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
मी खूपच रोमॅन्टिक आहे, मला 3-4 मुलांची तरी आई व्हायचंय – भूमी पेडणेकर
रणवीर आणि आलियाचा कीस करतानाचा ‘तो’ फोटो व्हायरल
नवरदेवाला पाहताच नवरी मंडप सोडून रस्त्यावर पळाली अन्…; पाहा व्हिडीओ