मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सिद्धार्थच्या कुटुंबासह टेलिव्हिजन इंडस्ट्री, सिद्धार्थचे मित्र, त्याचे चाहते सर्वचजण हळहळ व्यक्त करत आहेत. हे दु:ख पचवणे अनेकांसाठी अवघड झाले आहे.
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री शेहनाज गीलची अवस्था खूप वाईट झाली आहे. शेहनाजला सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख सहन होत नाहीए. सिद्धार्थच्या मृत्यूचे सर्वात जास्त दु:ख शेहनाजला झालं आहे.
सिद्धार्थच्या मृत्यूपासून शेहनाजची प्रकृती ठीक नसल्याची बातमी समोर आली होती. यानंतर सर्वांनाच तिची चिंता वाटू लागली आहे. शेहनाजला फक्त ग्लुकोजवर ठेवण्यात आलं असल्याचं देखील बोललं जात आहे. अशातच शेहनाजची डिझायनर केन फर्न्स हिने शेहनाजच्या प्रकृतीबद्दल खुलासा केला आहे.
शेहनाजच्या एका चाहत्याने केनला इस्टाग्रामवर शेहनाजच्या प्रकृतीबद्दल सवाल केला होता. शेहनाज सध्या ग्लुकोजवर आहे, असं लोक बोलत आहेत, हे खरं आहे का?, असा सवाल या चाहत्याने केन फर्न्सला केला होता.
शेहनाजच्या चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना केन फर्न्स म्हणाली की, नाही तिची तब्येत ठीक आहे. सुरुवातीला दोन तीन दिवस तीने काही न खालल्याने तिची तब्येत खालावली होती. त्यावेळी तिला ग्लुकोज चढवण्यात आलं होतं. मात्र, आता ती ठीक आहे. केनच्या या उत्तरानंतर शेहनाजच्या चाहत्यांचा जिव भांड्यात पडला आहे.
दरम्यान, शेहनाज आणि सिद्धार्थ दोघे बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस मधील शेहनाज आणि सिद्धार्थची मैत्री सर्वांनाच खूप आवडली. शोदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले, मतभेद झाले, तरी देखील हे दोघे नेहमी एकमेकांच्या जवळ राहिले. त्यामुळे ही जोडी सर्वांची फेवरेट राहिली.
या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी सिदनाज असं नाव दिलं होतं. या दोघांचं बॉन्डिंग केव्हा केव्हा प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात अश्रू आणणारं ठरलं. मात्र, आता ही सिदनाजची जोडी आपल्याला केव्हाच एकत्र पाहायला मिळणर नाही.
महत्वाच्या बातम्या-
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लवकरच अडकणार लग्नबंधनात? शाहिरचा मोठा खुलासा
‘हेल्मेट घालूनच पहिला कंडोम विकत घेतला होता’; ‘या’ बड्या अभिनेत्याने शेअर केला मजेशीर किस्सा
अचानक अस्वल चढलं गाडीवर अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
झोपलेल्या चिमुकल्या जवळ जाऊन कुत्र्यानं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ
काय सांगता! माणसांप्रमाणे चक्क पक्षीही करतोय चोरी, पाहा व्हिडीओ