सुशांत प्रकरणी अभिनेता शेखर सुमन पुन्हा संतापला म्हणाला…

मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यू प्रकरणामुळे  देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या तीन उच्च दर्जाच्या एजन्सी याप्रकरणी शोध घेत होत्या. तरीही सुशांत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला होता.

मात्र, आता अखेर सुशांत प्रकरणातील गुंता सुटताना दिसत आहे. सुशांतच्या मृ.त्युप्रकरणी शोध घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीमसुद्धा सीबीआयला मदत करत होती. सुशांतच्या सर्व फॉ.रेन्सिक रिपोर्टची फेरतपासणी करत सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं सीबीआयला दिला आहे.

एम्सनं दिलेल्या रिपोर्टवर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. चित्रपट सृष्टीतील कलाकारांबरोबरच अनेकांनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता अभिनेता शेखर सुमन यानंही एम्स रुग्णालयानं सुशांत प्रकरणी दिलेल्या या रिपोर्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत प्रकरणाची गळा दा.बून ह.त्या, असं ट्वीट शेखर सुमन यांनी केलं आहे. सुशांत प्रकरणाला सध्या एक नाट्यमय वळण मिळालं आहे. त्यामुळे शेखर सुमन संतापला आहे. सुशांत प्रकरणाला न्याय मिळत नसल्याचं दुःख त्याने व्यक्त केलं आहे.

शेखर सुमननं यापूर्वीही सुशांत प्रकरणावर अनेकवेळा वेगवेगळे दावे केले होते. सुशांत सिंह राजपूतची आ.त्मह.त्या नसून त्याची ह.त्या करण्यात आली आहे, असा दावा शेखर सुमननं यापूर्वीही केला होता.

दरम्यान, सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सीबीआय सध्या सुशांतच्या आ.त्मह.त्येच्या बाजूने तपास करत आहे. मात्र, सीबीआयच्या तपासात अशी कोणतीही गोष्ट आढळली नाही की ज्याच्यावरून सुशांतनं रिया चक्रवर्तीमुळे आ.त्मह.त्या केली आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती समोर आली आहे.

सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं एनसीबी याप्रकरणी शोध घेत आहे. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केलं होतं. मात्र, न्यायलयानं 28 दिवसांनंतर रियाचा जा.मीन अर्ज मंजूर केला आहे. रियाला जा.मीन मिळाल्यानंतरही शेखर सुमननं संताप व्यक्त केला होता.

तसेच रिया चक्रवर्तीनं सुशांतचे पैसे खर्च केल्याचं बोललं जात होतं. मात्र, गेल्या पाच वर्षांत 70 कोटी रुपयांतील 55 लाख रुपये सुशांतनं रियासाठी खर्च केल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे. परंतु हे पैसे केवळ ट्रिप्स, स्पा आणि गिफ्ट्स यासाठी वापरण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

हाथरस प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती उघड, पीडितेची वहिनी म्हणून आलेली ती…

भीक मागितली, झाडून घेतलं; आता 150 लोकांना काम दिले, इतक्या कोटींची कमाई!

सलमानबर काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीनं चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

धक्कादायक! सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात त.क्रार दाखल!

रेखानं ‘या’ कारणाने बहिणीला चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही