मुंबई | सामनाच्या रोखठोक या स्तंभाच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेता सोनू सूदच्या कामावर टीका करणारा लेख लिहिला आहे. सोनू सूदला भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, असा संशय राऊत यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून व्यक्त केला होता. त्यावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या असतानाच भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी सोनू सूदला एक पत्र लिहित त्याची माफी मागितली आहे.
संजय राऊत यांनी सोनूवर टीका केल्यानंचर भाजप आता सोनूच्या मदतीला धावून आलं आहे. सोनू आम्हाला माफ कर, आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरलेली नाही, अशा आशयाचं पत्र लिहित श्वेता शालिनी यांनी सोनूची माफी मागितली आहे.
सोनू मला माफ कर. मी देखील या राजकीय व्यवस्थेचा भाग आहे. ही ती व्यवस्था आहे की जी प्रत्येक गोष्टीला राजकीय स्वरूप किंवा रंग देण्याचा प्रयत्न करते. चांगल्या गोष्टीतही वाईट बघण्याची ही वृत्ती आहे.आम्ही लोकांमध्ये त्यांचा जीव पाहत नाही, तर मतदार म्हणून त्यांचा आकडा मोजतो. आम्हाला लोकांच्या संवेदनशीलतेचा राग येतो, कारण आमच्यातील संवेदनशीलतेला आम्ही खूप आधीच मारून टाकलंय, असं श्वेता यांनी पत्रात लिहिलं आहे.
स्थलांतरितांचा रंग, धर्म, जात न बघता तू त्यांना मदत केलीस. हे आम्ही एकवेळ विसरू पण तू कोणाची भेट घेतलीस हे विसरणार नाही. राज्यपाल तुला काय म्हणाले, हे सामनाला माहित आहे, पण या स्थलांतरितांकडून तुला आलेल्या हजारों मेसेजवर पडदा टाकतील. एक व्यक्ती बदल घडवून आणू शकतो हे तू सिद्ध केलंस आणि ते बदल घडवण्यासाठी त्या व्यक्तीला मुख्यमंत्री असण्याची गरज नाही. तुझ्यासारखे लोक देशाला प्राधान्य देतात. तू खरा हिरो आहेस, असंही शालिनी यांनी पत्रात म्हटलं आहे.
Dear @SonuSood
My #OpenLetter to you.
I am Sorry.🙏🙏@rautsanjay61 @OfficeofUT @AUThackeray @Saamanaonline pic.twitter.com/KASUGWMOEm
— Shweta Shalini (@shweta_shalini) June 7, 2020
महत्वाच्या बातम्या-
-कोरोना संसर्गाबाबत चीनने केला मोठा खुलासा
-बहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, चीनने भारताला ललकारलं
-दहावी बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, पाहा कधी लागणार निकाल…
-“सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत हे चीनला दाखवून द्यायची हीच ती वेळ”