मुंबई | राज्यातील, तसेच देशातील काही खासगी बँकांमधील घोटाळे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारनं खबरदारी म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्यात यावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.
सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळे आदींनी बँकेचे सर्व व्यवहार राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातूनच करावेत, असा निर्णय सरकारने आज घेतला.
खासगी किंवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही सरकारी योजनांचा निधी जमा करण्यासाठी उघडलेली खाती १ एप्रिलपासून बंद करून, केवळ राष्ट्रीय बँकांमध्येत खाती उघडावीत, असं आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, सोयीचं पडावं म्हणून त्यांची बँक खाती खासगी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली होती. त्यामुळं सरकारच्या निर्णयानुसार आता ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात यावीत, असं आवाहन सरकारने केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“तुम्ही सेक्युलर असाल तर आंबेडकरांच्या नावाला पाठिंबा द्या”
-सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यांवरुन उर्जामंत्र्यांनी केलं ब्राह्मण समाजाला लक्ष्य!
-मोठी बातमी : लवकरच कोरोनावरील औषधाचा शोध लागणार!
-अखेर डोनाल्ड ट्रम्पही पडले नमस्काराच्या प्रेमात!
-तर पुढील आठवड्यात पेट्रोल 70 रूपये लिटर होवू शकत…