स्वतःचाच ‘तो’ विक्रम मोडत शिखर धवन ठरला ‘चौकार किंग’!

नवी दिल्ली | आयपीएलच्या 13 व्या पर्वातील 34 वा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने उभारलेली धावसंख्या दिल्ली कॅपिटल्सच्या एकाच खेळाडूने पार करण्यात मोठा हातभार लावला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने जोरदार फटकेबाजी करत यशस्वी वाटचाल केली आहे.

या सामन्यात शिखर धवन याने आयपीएलमधील पहिलेच शतक केले. पण त्याचबरोबर अजून एक विक्रम केला. शिखर धवन याने आयपीएलमध्ये चौकार मारण्याच्या बाबतीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

आयपीएलमध्ये चौकार मारण्याच्या यादीत पहिल्यापासूनच शिखर धवन याचे नाव आहे. मात्र, त्याने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. आयपीएलमधील 550 चौकार पूर्ण करणारा शिखर धवन हा पहिला खेळाडू ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध शिखर धवन याने नाबाद 101 धावा केल्या. यामध्ये त्याने 14 चौकार आणि एक षटकार मारला. या 14 चौकरांच्या मदतीने शिखर धवन याने आयपीएल मधील हे स्थान मिळवले आहे.

यामुळे आता शिखर धवनची आयपीएलमधील ‘चौकार किंग’ ही नवी ओळख निर्माण झाली आहे. चौकार मारण्याच्या यादीतील हे स्थान शिखर धवन याने बऱ्याच काळापासून टिकवून ठेवलीआहे.

या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 498 चौकार मारले आहे. तसेच सुरेश रैना हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 493 चौकार मारले आहेत. चौथ्या क्रमांकावर गौतम गंभीर आहे. त्याने 491 चौकार मारले आहे.

डेव्हिड वॉर्नर हा पाचव्या क्रमांकावर असून त्याने 480 चौकार मारले आहेत. तसेच रोहित शर्मा हा सहाव्या क्रमांकावर असून त्याने 451 चौकार मारले आहे. शिखर धवन याच्या मागील तीन सामन्याबाबत बोलायचे झाले तर त्याने दोन अर्धशतक केले आहे आणि सीएसकेविरुद्ध शतक केले आहे.

मागील तीनही सामन्यात शिखर धवन हा नाबाद राहिला आहे. त्याने सीएसकेविरुद्ध 51 धावा, राजस्थान रॉयलविरुद्ध 57 धावा आणि पुन्हा सीएसकेविरुद्ध 101 धावा केल्या आहेत.

या तिनही सामन्यात शिखर धवन याने संघाला जिंकवण्यात मोठी भूमिका निभावली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने 19.5 षटकामध्ये 5 बळी राखून 185 धावा करून विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! काहीच डाऊन पेमेंट न करता ‘ही’ गाडी खरेदी करता येणार

सचिन तेंडूलकर नंतर आता केएल राहुलनंही केला ‘तो’ विक्रम!

परिस्थितीवर मात करत हिमाचलचा ‘हा’ व्यक्ती न्यूझीलंड सरकारमध्ये बनला मंत्री!; वाचा सविस्तर

आयपीलमध्ये ‘या’ युवा खेळाडूनं अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकत रचला नवा विक्रम!

भारतीय खेळाडूंनी रचला नवा विक्रम! आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडली ‘अशी’ गोष्ट