शिखर धवन पुन्हा तळपला! या आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर केला

नवी दिल्ली | 2020च्या आयपीएल मोसमात खेळाबरोबरच अनेक विक्रम क्रीडा रसिकांना पाहायला मिळाले. काही वेळा रोमांचक आणि थक्क करणारा खेळ तर काही वेळा नवनवे विक्रम असे दुहेरी रूप या आयपीएलमध्ये पाहायला मिळाले.

या मोसमातील 38वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला. सध्या दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन हा अजबच अंदाजात दिसत आहे.

या सामन्यात त्यानं सलग दुसरे शतक केलं आहे. याच्या आधीच्या सामन्यात शिखर धवनने 101 धावा करून नाबाद खेळी खेळली होती. त्यानंतर आता याही सामन्यात त्यानं जोरदार फटकेबाजी करत शानदार शतक ठोकले.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध आणि या आयपीएल मोसमातील त्याचे हे दुसरे शतक आहे. याबरोबरच त्याने 5000 धावांचा टप्पाही ओलांडला आहे.

आयपीएलच्या इतिहासात शिखर धवन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे, ज्यानं सलग दोन शतक केले आहे. त्याने पंजाब संघाविरुद्ध 58 चेंडूत शतक पूर्ण केलं आहे. यात त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.

शिखर धवननं 61 चेंडूत 106 धावा केल्या आहेत. यावेळी स्ट्राईक रेट 173.77 इतका  होता. शिखर धवनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्स संघाने 164 धावांचे लक्ष गाठले. शिखर धवनने आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीत 169 सामने खेळले आहेत.

त्याने आयपीएलमध्ये 5043 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये एका मोसमात सर्वाधिक शतक करणारा शिखर धवन हा खेळाडू आहे. त्याने 2016 मध्ये एकूण चार शतक केले होते.

त्यातच ख्रिस गेल, हाशिम आमला आणि शेन वॉटसन यांनी एका मोसमात दोन-दोन शतक केले होते. आता शिखर धवन यानं त्यांची बरोबरी केली आहे. एका मोसमात विराट कोहली यानं 4 शतक केले होते.

शिखर धवन यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलग दोन शतक केले आहेत. त्याच्या संघाकडून सर्वाधिक शतक करणारा डेव्हिड वॉर्नर याची आता शिखरनं बरोबरी केली आहे. डेव्हिड वॉर्नर यानंही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलग दोन शतक केले आहेत.

आयपीएलमध्ये चौकार मारण्याच्या यादीत पहिल्यापासूनच शिखर धवन याचेच नाव आहे. पण त्यानं स्वतःचाच विक्रम मोडला आहे. आयपीएलमधील 550 चौकार पूर्ण करणारा शिखर धवन हा पहिला खेळाडू ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्याची भरदिवसा चाकूने वार करून ह.त्या

ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये रचला नवीन इतिहास! कोणीही न करू शकलेला विक्रम करून दाखवला