शिल्पा आणि राजचं नातं टांगणीला! शिल्पाने घेतला मोठा निर्णय?

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटत झाल्यापासून शिल्पाच्या देखील अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाचा परिणाम शिल्पाच्या व्यावसायिक आयुष्यावर होताना दिसत आहे. शिल्पाला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.

तसेच शिल्पावर मुलांची देखील जबाबदारी आली आहे. या कठिण काळात शिल्पा स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता शिल्पाने राज कुंद्रा आणि आपल्या नात्यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतल्याचं समजत आहे.

शिल्पा आपल्या मुलांना घेऊन राज कुंद्रापासून विभक्त होणार असल्याचं बोललं जात आहे. शिल्पा आपल्या मुलांना घेऊन राज कुंद्राच्या घरातून बाहेर पडणार आहे. आपल्या नवऱ्याने चुकीच्या मार्गातून कमावलेल्या पैशांपासून शिल्पाला आपल्या मुलांना दूर ठेवायचं आहे, अशा देखील चर्चा चालू आहेत. शिल्पाच्या एका मित्राने याबद्दल माहिती दिली आहे.

शिल्पाच्या एका मित्राने याबद्दल बोलताना सांगितलं की, राज कुंद्रा अशा मार्गातून पैसा कमावत आहे, हे शिल्पाला माहित देखील नव्हतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर तिला देखील धक्का बसला होता. आपल्या नवऱ्याने अशा मार्गातून कमावलेल्या पैशापासून तिला आपल्या मुलांना दूर ठेवायचं आहे.

तसेच शिल्पा राजचे पैसे वापरत नाही. आपल्या पैशांनीच मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय तिने घेतला आहे, असं देखील शिल्पाच्या मित्राने सांगितलं आहे. मात्र, शिल्पाने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर 4’ या रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी ज्यावेळी राज कुंद्राचं नाव समोर आलं होतं त्यावेळी शिल्पा या शोमधून गायब झाली होती. मात्र, काही दिवसाने ती पुन्हा कामावर परतली आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारती सिंग लवकरच आई होणार? माध्यमांशी बोलताना म्हणाली…

सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत तुर्कीत करतोय मजा?

पियंका चोप्रानं पतीसोबत शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी

शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय…