Top news मनोरंजन

‘या’ विवाहित दिग्दर्शकाला हृदय देऊन बसली होती शिल्पा शेट्टी, बायकोला कळाले अन….

मुंबई| बॉलिवूडमधील अनेक कलाकार सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटामुळे तर कधी त्यांच्या पर्सनल लाईफमुळे. तसेच अनेक कलाकार हे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. या कलाकारांच्या नावातील एक नाव म्हणजे शिल्पा शेट्टी.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. शिल्पा शेट्टी फिल्म इंडस्ट्रीमधील एक नावाजलेली अभिनेत्री असून चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावर रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून पण काम करते. ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी कायम आपले व्हिडीओ शेअर करत असते.

शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या फिटनेस, वर्कआऊट बाबत चर्चेत असते. तसेच अनेकदा ती आपल्या वर्कआऊटच्या आणि योगाच्या व्हिडिओज् इंन्टाग्रामवर शेअर करत असते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी करियरच्या सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीमध्ये झळकलीये. एकेकाळी शिल्पाचं खाजगी आयुष्य चांगलंच चर्चेचा विषय ठरला होता. तिचं आयुष्य एका दिग्दर्शासोबत जोडले गेले होते.

90 च्या दशकात शिल्पा आणि अक्षय कुमार एकमेकांना डेट करत होते. पण त्या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. परंतु या नात्यानंतर तिचे नाव दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत जोडले गेले होते. या गोष्टीवर बराच वाद-विवाद सुद्धा झाला होता. अनुभव सिन्हा आणि शिल्पा यांची ओळख ‘दस’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पण त्यावेळी अनुभव सिन्हा विवाहित होते. तसेच त्यांना एक मुलगा देखील होता.

शिल्पा आणि अनुभव दोघं जेव्हा प्रेमात होते, तेव्हा त्याच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या येत होत्या. त्यामुळे या समस्यांमुळे त्यांच मन शिल्पाकडे ओढावले असल्याचे शिल्पाच्या जवळच्या व्यक्तीने म्हटले आहे.

अनुभव यांची पत्नी रत्ना यांना या रिलेशन बद्दल कळताच प्रचंड वाद झाला होता.रत्ना यांनी शिल्पावर अनेक आरोप केले. तसेच तिच्या कुटुंबीयांना तिने अनुभवला डेट केलेले आवडत नव्हते. परंतु या सगळ्या अफवा असल्याचं शिल्पाने एका मुलाखतीमध्ये सांगिलते होते.

दरम्यान, 2007 मध्ये शिल्पा यूकेच्या ‘बिग ब्रदर’ या शोमध्ये सहभागी झाली होती, त्या शो मध्ये तिनं विजय पटकावला. त्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलले.

महत्वाच्या बातम्या-

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे…

बाळाला झोपवण्यासाठी चक्क डॉक्टरांनी गायली अंगाई, पाहा…

बाबांनी बनवला अनोखा मास्क, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘जीने मेरा दिल लुटया…’; चिमुकल्याचा…