लग्नाच्या कित्येक वर्षानंतर शिल्पाचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, सलमान रात्री माझ्या घरी यायचा आणि मग…

मुंबई | चित्रपट सृष्टीतील प्रेम प्रकरणं हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. बॉलीवूड मधील अनेक प्रेम प्रकरणं आत्तापर्यंत समोर आली आहेत. अभिनेता सलमान खान देखील त्याच्या प्रेम प्रकरणामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचे नाव जोडले गेले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांच्या प्रेम प्रकरणाच्या देखील 90च्या दशकात चर्चा चालू होत्या.  मात्र, या दोघांनी केव्हाच आपल्या नात्याची कबूली दिली नव्हती. पण हे दोघे नेहमी एकत्र दिसत असायचे. दोघेही त्यांच्या आयुष्यात आता खूप पुढे गेले आहेत. अशातच आता लग्नाच्या कित्येक वर्षानंतर शिल्पा शेट्टीने सलमान विषयी मोठा खुलासा केला आहे.

शिल्पाने तिच्या लग्नानंतर तब्बल ९ वर्षाने तिच्या आणि सलमानच्या नात्याची कबूली दिली आहे. 90च्या दशकात या दोघांचे प्रेम प्रकरण एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुरु झाले होते. मात्र, या दोघांनी केव्हाच नात्याची कबूली दिली नव्हती. आता एका मुलखाती दरम्यान शिल्पाने सलमान सोबतच्या आठवणींना उजाळा देत मोठे खुलासे केले आहेत.

शिल्पा म्हणाली की, सलमान नेहमी माझ्या घरी यायचा आणि रात्री माझ्याच घरी रहायचा. सलमान माझ्या घरी आल्यानंतर माझ्या वडिलांसोबत मस्ती करत असायचा. तो माझ्या वडिलांसोबत ड्रिंक्स देखील घेत होता. यामुळे तो माझ्या वडिलांच्या खूप जवळ होता.

मला आठवते की, जेव्हा माझ्या वडिलांचे नि.धन झाले होते तेव्हा सलमान माझ्या घरी आला होता. तो त्यावेळी खूप रडला होता. तो त्या दिवशी त्याच टेबलवर बसून रडला जिथे तो आणि माझे वडील बसून ड्रिंक करायचे, असंही शिल्पाने सांगितलं आहे.

दरम्यान, 90च्या दशकात या दोघांनी त्यांच्या नात्याची कबूली दिली नसली तरी यांच्या नात्याविषयी नेहमी माध्यमांमध्ये काही न काही चर्चा चालू असायच्या. यावेळी दोघेही त्यांच्या करिअरच्या अगदी टॉपला होते.

असे म्हटले जाते की, शिल्पा सलमान बद्दल खूप गंभीर होती. मात्र, जेव्हा तिला समजले की त्या दोघांचे लग्न होऊ शकणार नाही तेव्हा तिने त्याच्याशी ब्रेक अप केला.

यानंतर शिल्पा शेट्टीने बिझनेसमॅन राज कुंद्रा यांच्याशी लग्न केलं आहे. हे दोघे एकत्र खूप खुश दिसत असतात. दोघेही नेहमीच सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टीव्ह असतात. शिल्पा नेहमी सोशल मीडियावर पतीसोबातचे फोटो शेअर करत असते.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणातील रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; ‘या’ व्यक्तीचा जामीन मंजूर

सुशांतनं ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागं टाकलं; रिया टाॅपवर!

उद्योगातून नव्हे तर शेतीतून दरवर्षी तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त उत्पादन घेते ‘ही’ महिला

कंगनाच्या भावाचा लग्नादरम्यानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ

दुःखद बातमी! भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचं नि.धन, राजकीय क्षेत्रात हळहळ