Top news मनोरंजन

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला

Photo Credit: Twitter/ @attarirahul & @shilpashetty

मुंबई | पॉर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाली आहे. पतीच्या अटकेनंतर काही काळासाठी शिल्पाच्या हातातील अनेक कामे सुटली होती. परंतु शिल्पा आता पुन्हा कामावर परतलेली दिसत आहे.

शिल्पा शेट्टी हिंदू रितिरिवाजप्रमाणे प्रत्येकच सण उत्सव साजरा करत असते. पती जेलमध्ये असताना देखील शिल्पाने आपल्या घरी गणरायाची स्थापना केली होती. या संकटातून देवच आपल्याला तारेल, अशी श्रद्धा शिल्पाची आहे.

अशातच आज देखील शिल्पा शेट्टी आपल्या कुटुंबाच्या सुख समाधानासाठी माता वैष्णोदेवीच्या चरणात नतमस्तक झाल्याचं दिसलं. आपल्या कुटुंबासाठी नवस मागायला शिल्पा मातेच्या दरबारात गेली होती.

शिल्पाने मातेचा गड घोड्यावर बसून चढला. शिल्पा खूप भक्तिभावाने मातेच्या दरबारात दर्शनासाठी पोहचली होती. तिने यावेळी ‘जय माता दी’चा जप देखील केला. तसेच शिल्पाच्या रक्षणासाठी तिच्यासोबत कडक पोलीस बंदोबस्त देखील होता.

शिल्पा आज दुपारी जम्मू काश्मीर येथील कटरा याठिकाणी पोहचली. येथून मातेच्या मंदिरापर्यंतचा 13 किलोमीटरचा प्रवास शिल्पाने घोड्यावर बसून केला. मातेच्या दर्शनानंतर शिल्पाने माध्यमांशी देखील संवाद साधला.

मातेच्या दर्शनामुळे मला खूप दिवसांनंतर भरपूर आंनद झाला आहे. मी सध्या खूप खुश आहे. मातेच्या दर्शनाने माझ्या मनाला समाधान लाभलं आहे, असं यावेळी शिल्पा म्हणाली.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून भर ऑफिसमध्ये बहिणीनेच बहिणीला धो धो धुतलं, पाहा व्हिडीओ

वर्षभर सेक्स न करताही गर्भवती राहिली तरुणी? पोटदुखीमागे डॉक्टरांनी सांगितलं गजब कारण

मोठ्या बसला ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

पगार नाही दिला म्हणून कर्मचाऱ्यानी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

चक्क एका अजगराने गिळलं जिवंत हरिण, पाहा व्हायरल व्हिडीओ