सत्तेत येताच शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना धक्का; ‘या’ दोन निर्णयात बदल

मुंबई | नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या नव्या सरकारनं पहिले दोन महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळात 2 आणि 3 जुलै रोजी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबईत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेतील कारशेड बांधण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, अशी माहिती आहे.

मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ देखील झाला होता.

आरेमधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.

देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला प्रकल्प जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडीचं सरकार असताना बंद करण्यात आली.

आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यानंतर ही योजना पुन्हा सुरु करण्याबाबत निर्देश दिले गेले असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर मी देवेंद्र फडणवीसांना शाबासकी दिली असती- शरद पवार 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात सत्तांतर होताच शरद पवारांना धक्का 

“देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच व्हायचं होतं तर…” 

अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे- शरद पवार 

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री