आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिंदे गट सरसावला, केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | एकनाथ शिंदे व शिंदे गटातील बंडखोर आमदार गेल्या आठवड्याभरापासून आसाम येथील गुवाहाटीत मुक्कामाला आहेत. शिंदे गट आसाममध्ये मुक्कामाला असताना आसाममधील एका भागात नागरिक पुराने त्रस्त आहेत.

महाराष्ट्रात शिंदे गटाविरोधात शिवसेना आक्रमक झालेली असताना आसाममधील पूरग्रस्तांसाठी शिंदे गट पुढे सरसावला आहे. आसाममधील पुरग्रस्तांसाठी शिंदे गटाकडून मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे.

आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.

एकनाथ शिंदेंनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. शिंदे गटाने आसाममधील पूरग्रस्तांसाठी 51 लाखांची मदत जाहीर केली आहे.

आसाममध्ये पावसाचा तडाखा वाढत असल्याने शिंदे गटातील सर्व आमदार लवकरच आसाममधून बाहेर पडणार आहेत. तर बहुमत चाचणीआधी हे आमदार आसाममधून बाहेर पडून गोव्यात येणार आहे.

दरम्यान, सध्या राज्यापालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता बहुमत चाचणी होणार का? याचा निकाल आज संध्याकाळी 5 वाजता लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

संजय राऊत आजपासून बोलणं बंद करणार, स्वतःच सांगितलं कारण…

राज्यपालांनी मारली मेख! पत्रातील ‘हे’ 6 आदेश काढू शकतात ठाकरे सरकारची विकेट

एकनाथ शिंदे अडचणीत, गाड्यांच्या किंमती, शेतजमीन लपवल्याचा आरोप

“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात अखेर भाजपची उडी, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला