मुंबई | शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी ठाकरेंकडे असलेल्या 14 आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेनेतील 14 आमदार आणि आणि वेगळे नाही, दिपक असं केसरकरांनी म्हटलं आहे.
आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. कदाचित ते नसतील. आमचा व्हीप नाही पाळला तर त्यांना डिसक्वालिफाय करायचा की नाही हे शिंदे साहेब ठरवतील, असा इशाराही केसरकर यांनी दिला आहे.
संजय राऊत मधेच असतील तर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता नाहीय. नाहीतर आम्ही ठाकरेंना आमच्यासोबत बोलवू, तेच आमचे नेते आहेत, असंही ते म्हणालेत.
आम्ही उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाण्याआधीच भेटलो होतो, सारे काही सांगितले होते. परंतू, आम्हाला काही नेत्यांनी लांब केले. ठाकरेंच्या एनसीपीचे नेते जवळचे झाले, आणि आम्ही लांब होत गेलो, असं ते म्हणालेत.
दरम्यान,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत नव्या मंत्रिमंडळा संदर्भात चर्चा होणार आहे. दुपारपर्यंत नव्या मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. यानंतर 12 वाजता शिंदे गटाची बैठक होणार आहे, अशी माहिती आहे. मात्र त्याआधी संभाव्य मंत्रीमंडळाची यादी समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, डॉ. अशोक उईके, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, माधुरी मिसाळ या नेत्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, वाचा संभाव्य मंत्रीमंडळ
“स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभे राहिले”
औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक, म्हणाले ‘या दलाल नेत्यांवर थुंका’
आता महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता जाणार शिंदे गटात