उद्धव ठाकरेंना मोठा झटका! शिंदे गटाचं नाव ठरलं?

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदाकांना घेत बंड पुकारल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दोन तृतीयांशपेक्षा जास्त शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात असल्याने खरी शिवसेना कोणती असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यात आता एकनाथ शिंदेंच्या गटाचं नवं नाव ठरलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या गटाचं शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असं नाव ठरल्याचं म्हटलं जात आहे. आज संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे 38 तर अपक्ष असे मिळून 50 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात शिंदे गट शिवसेनेतून अधिकृतपणे बाहेर पडला तर उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसू शकतो.

सध्या राजकीय हालचालींना वेग आले असून आदित्य ठाकरे शिवसेनाभवनात दाखल झाले आहेत. तर संतप्त शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचे पोस्टर फाडण्यात येत आहेत.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न करण्यात आले पण काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीनेही शिंदे गटाविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीची शिवसेना आमदारांवर मोठी कारवाई, एकनाथ शिंदे म्हणतात…

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी होणार?

“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”

मोठी बातमी! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल

“अजित पवार सुडानेच पेटलेले, पाय धरून पाया पडलो तरी…”; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल