मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा भाजपला जोरदार झटका

ठाणे | आगामी काळात राज्यात बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पक्षांतराचं वारं वाहताना पाहायला मिळत आहे. सध्यातरी पक्षांतराचा जास्त फटका भाजपला बसताना दिसत आहे.

राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेला ओळखण्यात येतं. कल्याण डोंबिवलीत सध्यातरी जोरदार राजकीय खळबळ माजली आहे. याचा सर्वाधिक तोटा भाजपला होताना दिसत आहे.

भारतीय जनता पार्टी आपल्या खास ऑपरेशनसाठी अवघ्या देशात परिचीत आहे. ते म्हणजे ऑपरेशन लोटस हे होय. या ऑपरेशनच्या माध्यमातून भाजपनं आतापर्यंत अनेक ठिकाणी सत्तांतर घडवून आणलं आहे.

आता मात्र भाजप आपल्याच ऑपरेशन लोटसमध्ये अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील काही नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

ठाणे म्हटलं की सर्व महाराष्ट्रासमोर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे उभं राहायला लागतात. आपल्या कणखर नेतृत्वाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी अनेकदा भाजपला शह दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच साधारण पाचपेक्षा जास्त नगरसेवक आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. परिणामी आता या नगरसेवकांच्या पक्षांतरामुळं भाजपला जोरदार गळती लागल्याचं चित्र आहे.

कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा गड मानला जातो. पण गतनिवडणुकीत भाजपनं या शिवसेनेच्या गडातच शिवसेनेला कोंडीत पकडलं होतं. आणि तब्बल 42 नगरसेवक निवडून आले होते.

काही दिवसांपूर्वीच भाजपला मोठी गळती लागणार अशी चर्चा कल्याण डोंबिवली शहरात सुरू होती. पण यात थेट एकनाथ शिंदे यांचा हात असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण आता मात्र या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशानं एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीसाठी मोर्चाबांधणी चालू करत असल्याचं लक्षात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. परिणामी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षांतरानंतर भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष वाढणार आहे हे मात्र नक्की.

दरम्यान, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यानंतर शिवसेनेचा ठाण्यातील पर्यायानं शिवसेनेतील ठाकरे कुटुंबानंतर सर्वात मोठा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी ओळखण्यात येत. त्यांच्या याच वर्चस्वाला धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

 मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीकडून भाजपला दे धक्का

‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगणा राणावतला मोठा झटका, आता…

“विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, ती वेळ…” 

“मोदीसाहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत” 

“नरेंद्र मोदी सर्वात मोठे नौटंकीबाज, ते चुकून राजकारणात आलेत”