“भाजप सेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे, लवकरच कळवू”

मुंबई : भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, फॉर्म्युलाही ठरला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचा फॉर्म्युला ठरला आहे. यावेळी मी वेगळी पद्धत अवलंबली आहे, मुख्यमंत्री उमेदवारांची यादी तयार करून देतील ती आमच्या नेत्यांशी चर्चा करून युती जाहीर होईल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. युतीत कोणताही तणाव नाही. लवकरच युतीची घोषणा होईल, लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा फॉर्म्युला ठरला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्यावेळी लोकसभेला शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

त्यावेळी शिवसेनेची दुसरी अट होती ती म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जातील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या-