शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार? बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या…

मुंबई |  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होवून जवळपास वर्ष लोटून गेलं आहे. तरी देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येत सरकार स्थापन करणार, अशा चर्चा दब्या आवजात चालू आहेत. याच चर्चांना आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे.

पंकजा मुंडे मंगळवारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांवर भाष्य केलं आहे.

शिवसेना भाजपची युती 2014 मध्येही तुटली होती. यानंतर आता पुन्हा युती तुटून राज्यात सरकार स्थापन होवूनही एक वर्ष लोटून गेले आहे. यामुळे आता या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात काहीही अर्थ उरलेला नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

तसेच पंकजा मुंडे यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मुंडे कुटुंबीय यांच्यातील संबंधांवर देखील भाष्य केलं आहे. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर आहे यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्याचं पंकज मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. मुंबईत त्यांचं स्मृती स्थळ असल्यानं मी त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत. ते सर्वांचे आहेत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

तसेच बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबियांसाठी आदरणीय आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि मुंडेसाहेब या दोघांचे घरगुती संबंध होते. इतर अनेक पक्षातही असे संबंध असतातच, असंही पंकजा मुंडे बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर अनेक भाजप नेत्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकला आहे. अशातच आता आणखी एका बड्या नेत्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर आज ते स्वतंत्र्यपणे दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक कार्यालात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून मागार घेत आहे. भाजप पक्षातील नेत्यांना जास्त मस्ती आली आहे. तो पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर गेले आहेत. मात्र, मी भाजपला धडा शिकवणार आहे त्यासाठी पक्षाने तयार राहावे, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा धक्का! भाजपला मी धडा शिकवणार म्हणत ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी

मोठी बातमी! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरचा पवारांचा पहिलाच खानदेश दौरा ‘या’ कारणामुळे रद्द

‘…म्हणून राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतलं आहे’; प्रसाद लाड यांचा मोठा गौप्यस्फोट!

टायगर श्रॉफच्या बहिणीचा ‘त्या’ घटनेबद्दल मोठा खुलासा! स्वतः सोशल मीडियावर म्हणाली…

सुशांतच्या मृ.त्युनंतर देखील अंकिताने केलं ‘ते’ कृत्य, सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल