महाराष्ट्र मुंबई

मी काटे मोडत नाही तर, फक्त घड्याळाला चावी देतो- उद्धव ठाकरे

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करुन राष्ट्रवादीला मोठा झटका दिला आहे. अहिरांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे मोडले का?? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

मी काटे मोडत नाही तर फक्त घड्याळाला चावी देतो, असं मिश्कील उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीला टोलाही लगावला. 

मला फोडणारी माणसं नकोत तर मला मनं जिंकलेली माणसं पाहिजेत, असंही ते म्हणाले. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. 

आपण शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी संस्कृती गहाण ठेवणार नाही. सद्सद् विवेकबुद्धी गहाण ठेवणार नाही. अनेक चांगले नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

शरद पवार हे माझ्या हृदयात असले तरी मी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आलो आहे, असं मत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनी व्यक्त केलं आहे.

सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात मोठी गळती लागण्याची चिन्ह आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-सचिन अहिरांनी ‘राम राम’ करताच राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड!

-शिवसेनेने पडणारा नेता नेला- नवाब मलिक

-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला धक्का; हा आमदार भाजपच्या गळाला??

-भाजप प्रवेशाला नाही म्हटले म्हणूनच मुश्रीफांच्या घरावर धाड??

-“मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत”

IMPIMP