मुंबई : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटवण्यासंदर्भात राज्यसभेत शिफारस केली आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं. कोणी मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध केला तर कोणी त्यांचं कौतुक केलं.
15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन जवळ आला आहे. मात्र आज जम्मू आणि काश्मीरमधील 370 कलम हटवण्याच्या शिफारशीनंतर देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केलं आहे.
काही बेड्या शिल्लक होत्या त्या आता गळाल्या आहेत. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता. आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची आठवणही काढली.
देशात आजही पोलादीपणा शिल्लक असल्याचं उदाहरण देत त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे.
देशाचं सार्वभौमत्व सर्वात महत्वाचं आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काश्मीरसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला पााठिंबा देण्याचं आवाहनही केलं आहे.
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटावं आणि खऱ्या अर्थाने हे राज्य भारताचा भाग व्हावा हे शिवसेनेने गेली अनेक वर्षे उराशी बाळगलेलं स्वप्न आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
सेना-भाजपच्या जाहीरनाम्यातही याबाबत वटन देण्यात आले होते. आज हे वचन पूर्ण झालं. एक मोठ्ठ स्वप्न साकार झालं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सौ सौ सलाम आपको…!; परेश रावलांनी केलं मोदींचं कौतुक
-मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; जम्मू-काश्मीरसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय
-जम्मू काश्मीरसंदर्भात मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय
“मुख्यमंत्री महोदय, जनतेची कामं केल्याचा दावा करता तरी तुमच्यावर ही वेळ का येते?”
-“चंद्रकांत पाटील साधे आहेत; त्यांना पत्रकारांच्या गुगली कळत नाहीत”