Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही

मुंबई | महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत, अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे.

शिवसेनेनं यावेळी पाच राज्यातीव विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला आहे. मणिपूर, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यात शिवसेनेनं आपले उमेदवार उभे केले होते.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपर्यंत शिवसेनेला एकाही राज्यात एकाही जागेवर आघाडी मिळवता आली नाही. परिणामी सर्वस्तरातून शिवसेनेवर टीका होताना दिसत आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं तीन राज्यात जोरदार प्रचार केला होता.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य करताना उत्तर प्रदेश आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या. पण याचा फायदा शिवसेनेला अद्याप तरी होताना दिसत नाही.

दरम्यान, गोव्यात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार लढत होताना दिसत आहे. भाजपला सत्तेपासून दूर सारण्यासाठी काॅंग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं” 

गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल 

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’