जळगाव | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आणि भाजपनं जोरदार ताकद या निवडणुकीसाठी लावली होती.
राज्यातील 100 हून अधिक नगरपंचातींसाठी राज्यभरात निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. ही निवडणूक अनेक कारणांनी गाजली होती. परिणामी सध्या हा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात नगरपंचाय निवडणुकीत राज्य सरकार आणि भाजपमध्ये थेट लढती पहायला मिळाल्या आहेत. अशात काही नगरपंचायतींच्या निकालांनी दिग्गजांची चिंता वाढवली आहे.
राज्यातील दिग्गज नेते आणि काही महिन्यांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांना आपल्याच बालेकिल्ल्यात पराभव पत्करावा लागला आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित असले तरी या नगरपंचायत निवडणुकीत हे अनेक ठिकणी वेगवेगळे लढल्याचं पहायला मिळालं होतं.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी असा सामना रंगला होता.
शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील वादामुळं ही निवडणूक प्रचंड गाजली होती. यामध्ये शिवसेनेनं 9 जागा मिळवत सत्ता काबिज केली आहे.
एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला केवळ 7 जागा मिळाल्या तर भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपला केवळ 1 जागा मिळवता आली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात तब्बल 40 वर्ष राजकारण केलं आहे. परिणामी हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. मात्र महाजन यांना देखील यावेळी इथं दारूण पराभव पत्करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“येत्या काळात आम्ही त्यांना पुरून उरू, भाजपच ‘नंबर 1’चा पक्ष”
‘आज आबांची खूप आठवण येतेय’; रोहित पाटील भावूक
रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी
नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…
ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!