महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा भाजपला दणका!

नाशिक | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपला जोरदार झटका बसला आहे. 4 नगरसेवक शिवसेनेच्या (Shiv Sena) गळाला लागल्याचं समजतंय. मुंबईत आज मातोश्रीवर हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

शिवसेनेने सुनील बागुल यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. त्यांच्याच खांद्यावर महापालिका निवडणुकीची धुरा येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या मातोश्री आणि पुत्र हे सध्या भाजपमध्ये आहेत.

बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल या उपमहापौर आणि पुत्र मनीष हे भाजयुमोचे शहराध्यक्ष आहेत. हे दोघेही आता शिवसेनेमध्ये येणार असल्याची चर्चा आहे.

वसंत गिते सध्या शिवसेनेत आहेत. मात्र, त्यांचे पुत्र आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे भाजपचे नगरसेवक आहेत. ते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सातपूरमध्ये भाजपच्या तिकिटावर यापूर्वी निवडून आलेली एक नगरसेविका शिवबंधन बांधणार असल्याचे समजते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब यांनी ही राजकीय सूत्रे हलवले असून, निवडणुकीच्या तोंडावर याचा भाजपला चांगलाच फटका बसणार आहे.

दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून जोरदार टीका केली. या आरोपाला शिवसेनेने हे राजकीय उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेेनेचा ‘हा’ नेता तपास यंत्रणांच्या रडारवर 

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा करणाऱ्या युक्रेनला जो बायडन यांचा धक्का; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

नरेंद्र मोदींचा व्लादिमीर पुतिन यांना फोन, दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला  

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ