“उद्धव ठाकरेंनी फणस सोलावा तसं विरोधकांना सोलून काढलं”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून पहिल्यांदा राजकीय सभेला संबोधित केलं. बीकेसीवरील सभेत ठाकरेंनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

उद्धव ठाकरेंनी भाजप, राणा दाम्पत्य, मनसे, आरएसएस, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी या सर्वांवर धारदार टीका केली. त्यानंतर राज्याचं वातावरण तापलेलं आहे.

ठाकरेंच्या सभेनंतर लागलीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सभा घेत प्रत्युत्तर दिलं होतं. परिणामी राज्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांची सभा पाहून विरोधकांची झोप नक्की उडाली असेल. परवाच्या सभेत एक टोक बांद्रा तर एक टोक कुर्लामध्ये होतं, असं सामनातील अग्रलेखात म्हटलं आहे.

सामनाद्वारे आता विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. विरोधक कितीही टोमणा सभा म्हणत असले तरी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना फणस सोलावं तसं सोलून काढलं आहे, अशी टीका विरोधकांवर करण्यात आली आहे.

काश्मिरी पंडीतांवर होत असलेल्या अन्यायावर मात्र केंद्र सरकार काही ठोस भूमिका घेत नाही. देशात नागरिकांवर अन्याय होत आहे, असं देखील सामनाद्वारे सांगण्यात आलं आहे.

काश्मिरी पंडीत असणाऱ्या राहुल भट्टच्या हत्येनंतर देशभरातून विरोधी पक्ष केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या सभेतील भाषणात काश्मिरच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण”

“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही” 

  “कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल

  “मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”

  Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज