मुंबई | ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या नारायण राणेंविरोधात शिवसेनेने बोलू नये, शिवसेनेसाठी त्याने किती खून पाडले, हे विसरू नये आणि राणेंनीदेखील मातोश्रीविरोधात काही बोलू नये, अशी कळकळीची विनंती शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी केली आहे.
शिवाजी माने यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून भाजप आणि शिवसेना वादावर भाष्य केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल प्रचंड व्हायरल होत आहे. यात त्यांनी राऊतांना आणि शिवसेना नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.
ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरुद्ध आमच्यासारखा फाटका शिवसैनिक आयुष्यभर लढला त्याच शिवसैनिकाचं स्वप्न पूर्ण होत नाहीये…. अशी खंत शिवाजी माने यांनी बोलून दाखवली आहे.
शिवसेना भाजप बरोबर किंवा नारायण राणे यांच्या विरुद्ध ज्या पद्धतीने वागतेय, ते योग्य नाही. राणे साहेबांच्या घामामधून शिवसेना पुढे आलेली आहे हे शिवसेनेने विसरता कामा नाही. त्यांच्या विरोधात शिवसेनेनं आता बोलू नाही, त्यांनी काय केलं आणि किती खून पाडले यावर बोलू नाही. आणि राणेसाहेबांनीसुद्धा मातोश्री विरोधात बोलण्याचं काही कारण नाही, असंही ते म्हणालेत.
आम्ही अनेक वर्षे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात लढलो, प्रसंगी स्वतःवर गुन्हे नोंदवून घेतले. त्या काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात मात्र शिवसेना भाजप बोलायला तयार नाहीये. पण अनेक वर्षे ज्या भाजपसोबत शिवसेनेचं सख्य होत. त्या भाजप विरोधात मात्र शिवसेना रोज काही ना काही नवे मुद्दे उकरून काढून भांडण काढीत असते. हे शिवसैनिकांचं मोठ दुर्दैव आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, अॅड. शिवाजी माने हे हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसेना नेते आहेत. 1996 ला शिवसेना तिकिटावर खासदार झाले. दोन वेळा त्यांनी शिवसेन्चाय तिकिटावर खासदारकी भूषवली.
2004 मध्ये मात्र लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी या परभवासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते जबाबदार असल्याची उघड भूमिका मांडली.
महत्वाच्या बातम्या-
डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा!
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी भाऊ वाटतो, कारण…”
“सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”
मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना