मुंबई | राज्याच्या राजकारणात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं खळबळ माजली आहे. भाजप नेते नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे.
कोकणच्या राजकारणातील शिवसेना आणि राणे कुटुंबात पारंपारिक भांडणं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी अनेकदा या दोन्हींमध्ये संघर्ष उभा राहिलेला महाराष्ट्रानं पाहिला आहे.
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीला वादानं आणि जिवघेण्या हल्ल्यानं गालबोट लागलं होतं. त्यानंतर राज्यभर वाद उफाळून आला होता.
शिवसेना नेते सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला नितेश राणे यांनी केल्याचा आरोप परब यांनी केल्यानं राजकारण ढवळून निघाला होतं.
संतोष परब यांच्या तक्रारीनंतर नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून राणे हे अज्ञातवासात गेले आहेत. नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयानं देखील जामीन देण्यास नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयात शरण जाण्याचे आदेश दिले आहेत. राणे यांनी 10 दिवसांमध्ये न्यायालयाला शरण गेले नाहीत तर त्यांना अटक करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिवसेना नेत्यांनी भाजपवर आणि राणेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
कायदा हा सर्वांसाठी समान असतो. कोणाचाही उन्माद कायदा खपवून घेत नाही. कायद्यापुढं सर्वांना झुकावं लागतं. असा मस्तवालपणा, गुंडगिरी, दादागिरी, लोकांना धमकावणं हे पुर्वीचे दिवस आता राहिले नाहीत, असं कायंदे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिल्यानं त्यांच्याकडं जिल्हा न्यायालयात शरण येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी राज्यातील राजकारणात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार वाद पेटला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यायालयाचा नितेश राणेंना मोठा झटका, मारहाण प्रकरणी दिला हा निर्णय
‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत’; राऊतांनी भाजप नेत्यांना झापलं
“…तर राज्य सरकार चालवायची जबाबदारीही केंद्राकडेच द्या”
‘माझ्या ब्रा ची साईज देव…’; अभिनेत्री श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य
‘आज काळीज फाटलं’; आमदार विजय रहांगडालेंची लेकासाठी भावूक पोस्ट