‘…म्हणून ते हे सगळं करतायेत’; शिवसेना नेत्याने अभिनेता किरण मानेंना फटकारलं

मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. याचमुळे त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामुळे नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

महाराष्ट्रात किरण मानेंच्या समर्थनार्थ I Stand With Kiran Mane ही कॅम्पेन सोशल मीडियावर सुरु करण्यात आली. किरण माने प्रकरणात राजकीय नेतेमंडळीनीही उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी किरण मानेंना फटकारलं आहे.

किरण माने यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते असा वाद निर्माण करत आहेत. हा सगळा वेडेपणा आहे. मागच्या अनेक वर्षापासून मी इंडस्ट्रीत काम करतोय. पण मला इतक्या दिवसात असा कुठलाही अनुभव आला नाही, असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.

कुठलंही चॅनेल असं करत नाही. किरण मानेंच्या मताशी मी सहमत नाही. त्यांना मोठं व्हायचं असल्याने हे सगळं करतायेत, असा टोला बांदेकर यांनी लगावला आहे.

दरम्यान,कलाकारांनी राजकारणावर बोलू नये असे काही जण मला सूचवत आहेत. या आधीही अनेक अभिनेते होऊन गेले त्यांनी बरीचशी व्यक्तव्य केली आहेत. भूमिका घेतल्या आहेत. आपण जर या पुढील काळात बोललं नाही तर ही वृत्ती अशीच फोफावत जाणार, असं किरण माने म्हणालेत.

देशातील नागरिकांच्या दुर्दैवानं बातमी खरी आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही. नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करु असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. याचं कारण आहे की मी राजकीय पोस्ट म्हणता येणार नाही. पण मी एक विचारधारा मानणारा माणूस आहे आणि तशा पोस्ट मी करत असतो, असं किरण माने म्हणालेत.

बऱ्याच पोस्ट माझ्या या तुकाराम महाराजांचे विद्रोही जे अभंग आहेत, त्याचं आताच्या परिस्थितीला जोडून निरुपण मी करत असतो. तुम्ही फेसबुकवर शोधलं, #तुकाआशेचाकिरण तर त्यावर तुम्हाला माझ्या अनेक पोस्ट सापडतील, असं ते म्हणाले.

तुम्ही तुमचं मत मांडायचं नाही, नाहीतर बघा आम्ही काय करु तुम्हाला, हे किती दिवस आपण सहन करायचं? हे प्रत्येक नागरिकानं आता स्वत: ठरवायचं आहे, असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय 

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, आकडेवारीबाबत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 5 बड्या नेत्यांचा भाजपत प्रवेश 

उदयनराजेंना आवरला नाही ‘पुष्पा’चा मोह, ‘बलम सामे’ गाण्यावर उडवली काॅलर; पाहा व्हिडीओ