‘शिवसेनेच्या आमदारांना किडनॅप करून नेलं’, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीनंतर बंड पुकारला आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदारांच्या मोठ्या गटासह पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या जागी आता अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वर्षा निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मिलींद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी सुरत येथे पोहोचले आहेत.

आज सकाळपासूनच सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या आमदारांना किडनॅप केलं असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेच्या आमदारांना अपहरण करून सुरतच्या ले मेरेडियन हॉटेलमध्ये ठेवलं असल्याचा आरोप राऊतांनी केला. तर या सर्व आमदारांना गुजरात पोलीस व केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली.

अनेक आमदारांनी हॉटेलमधून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर खुनी हल्ले झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

दरम्यान, आमच्या आमदारांच्या जीवाला धोका असल्याचंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या दाव्यानंतर खळबळ उडाली असून या राजकीय नाट्याला कोणतं वळण लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठेवल्या ‘या’ अटी!

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत’, एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

“महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय”

Eknath Shinde | भाजपने एकनाथ शिंदेंना दिली ‘ही’ मोठी ऑफर?

शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्येही भूकंप होण्याची शक्यता!