जळगावात शिवसेना-राष्ट्रवादी आमने सामने; गुलाबराव पाटलांचं खडसेंना प्रत्युत्तर

जळगाव | जळगाव जिल्ह्यात आता शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असं टोकाचं राजकारण होताना दिसत आहे. शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील विरूद्ध एकनाथ खडसे असा संघर्ष होत असतानाचं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या वादात उडी घेतली आहे. एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यावर गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे-येवलकर यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्हचं आहे, असं म्हटलं आहे.

मात्र, जोपर्यंत पोलिसांकडून चौकशी पुर्ण होत नाही  तोवर आरोप करणे चुकीचं आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

या हल्ल्याची आयपीएस अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी, असं खुद्द स्थानिक आमदारांनी म्हटलं आहे. त्यानुसार चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी समोर येईलचं, असंही ते म्हणाले.

यात जो कोणी दोषी असेल मग तो आमच्या पक्षाचा असला तरी हयगय केली जाणार नाही. मात्र, पोलिसांकडून चौकशी करून नेमकं तथ्य समोर येईलचं, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील हे कोणत्या पक्षाचे आमदार आहेत त्याचं सर्टीफिकेट एकनाथ खडसेंनी देऊ नये. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.

कोण कोणत्या पक्षात होते आणि पक्ष  सोडून आता कोणत्या पक्षात आहेत. हे साऱ्या जगाला माहित आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा हे बघण्यापेक्षा तो महाविकास आघाडीचा आमदार आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

तसेच खडसे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. गोष्टी इतक्या पुढे जाऊ नयेत याची काळजी त्यांनी आधीपासूनच घ्यायला हवी होती, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

आमचेही विरोधक जळगाव जिल्ह्यात आहेत. आम्हीही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतो. परंतु, इतक्या खालच्या पातळीवर कोणी जात नाही, अशी टीका त्यांनी नाव न घेता केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, ओमिक्राॅन रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

 भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”

 नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता