“शिवसेना-राष्ट्रवादीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता”

मुंबई | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बिघाडी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादीविरोधात नाराजी जाहीर केली होती.

अशातच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते संजय राऊतांनी देखील गृहखात्याच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

आज दोन्ही बाजूने म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून या चर्चा म्हणजेच एप्रिल फूल असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशातच आता भाजप देखील या प्रकरणावर डोळे बारिक करून लक्ष ठेवत असल्याचं दिसतंय.

अशातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हणलं आहे. त्यावर आता वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद मागितलं जात आहे. हे ऐकूनच मला आश्चर्य वाटलं, असं मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री असून त्यांना कोणतंही खातं ठेवण्याची गरज नाही. सर्व खाती त्यांच्या नियंत्रणात असतात, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नको. याच सूड भावनेतून राज्याचा एक राजकीय पक्ष भाषा करत असेल तर आश्चर्यच असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sharad Pawar: शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्री ठाकरे गृहखात्यावर नाराज?, दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं…

Video | गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंडचा भररस्त्यात राडा; डिलिव्हरी बॉय सोडवायला गेला अन् भलतंच घडलं…

“गृहखात्यानं कठोर पावलं उचलावी अन्यथा…” 

फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका, स्वत:चा विकासही त्यातून करा- नरेंद्र मोदी