मुंबई | आज शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे आणि या उमेदवाराचे नाव जाहीर केल्याची माहिती समोर आलीये.
शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार (Kolhapur) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेनेने संजय पवार यांना आपले उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं असल्याने आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात, तसेच संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढवणार का? हे पहावं लागेल.
संजय पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसंच नगरसेवक ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
दरम्यान, माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं हे सविस्तर ठरलेलं आहे, असं संभाजीराजे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन”
“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?”
“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”