राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या बहुमत चाचणी होणार?

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात भाजपने देखील आता महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात उडी घेतल्याने राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडाळीमुळे आता महाविकास आघाडीकडे बहुमत नाही. त्यामुळे राज्यात बहुमत चाचणी व्हावी, अशी विनंती करणारं पत्र भाजपच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांना दिलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारला दिले आहेत. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेनेनं आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

राज्यापालांच्या आदेशाला शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तीन वाजेपर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेच्या बहुमत चाचणी विरोधातील याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे उद्या राज्यात बहुमत चाचणी होणार का हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात उडी घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या एकापाठोपाठ एक बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे व शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार आज गुवाहाटीहून गोव्यासाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे आता राज्यात सत्तापालट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिंदे गट सरसावला, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत आजपासून बोलणं बंद करणार, स्वतःच सांगितलं कारण…

राज्यपालांनी मारली मेख! पत्रातील ‘हे’ 6 आदेश काढू शकतात ठाकरे सरकारची विकेट

एकनाथ शिंदे अडचणीत, गाड्यांच्या किंमती, शेतजमीन लपवल्याचा आरोप

“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”