“स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडलेले”

मुंबई | संपूर्ण देश या लढ्यात मोदींच्या पाठीशी उभा आहे. राहुल गांधी यांनीही मोदींच्या प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे. मात्र स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडले आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

इस्लामपूरबाबत जे वक्तव्य महाराष्ट्रातील चवचाल भाजपावाल्यांनी केलं ते मोदींच्या कानावर गेलं तर मोदीच अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसाठी ही योग्य केस आहे. मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कायद्याने कारवाई व्हावी असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाउन म्हणजे नोटाबंदी नव्हे, असं जयंत पाटील म्हणाले होते. यावर भाजपला इतक्या मिरच्या झोंबायचं कारण काय? म्हणजे ज्यांनी ज्यांनी या काळात मोदींवर टीका केली त्या प्रत्येकाच्या गावात, घरात, जिल्ह्यांमध्ये कोरोना घुसू द्या आणि बळी जाऊ द्या असं भाजपच्या प्रवक्त्यांना वाटत असावं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-मुंबई पालिका आयुक्तांचा ‘तो’ निर्णय मंत्री नवाब मलिकांनी मागं घ्यायला लावला

-मुकेश अंबानींकडून तब्बल इतक्या कोटींची मदत; महाराष्ट्रासह आणखी या राज्यालाही केली मदत

-‘सरकार एकटं नाही लढू शकणार’; कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘नाम’चा मदतीचा हात

-‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा, काटकसरीने वागा- शरद पवार

-प्रवरा मेडिकल ट्रस्ट 6 दिवसात उभारणार ‘कोविड 19’चे नवीन हॉस्पिटल; मदतीचं आवाहन