मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर शिवसेना समाधानी!

मुंबई : भारतापुढे सध्या सगळ्यात मोठी समस्या कोणती असले तर ती लोकसंख्येची. सध्या देशापुढे ज्या काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात शहरांकडे वाढत असलेले लोंढे असोत किंवा वाढती बेरोजगारी. देशातील प्रदूषणापासून स्वच्छतेपर्यंतच्या सगळ्या समस्यांचं मूळ हे लोकसंख्येत आहे. देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. प्रबोधनपर कार्यक्रमांचा मारा करूनही फारसा फरक पडत नसल्याचे दिसत आहे.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने कृतीशील आराखडा तयार करण्याची गरज आहे. त्याचीच एक झलक म्हणून की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला.

छोटे कुटुंब असणं ही एक प्रकारची देशभक्ती असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. त्यांच्या या पुढाकाराविषयी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम छोट्या कुटुंबाचे समर्थन केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शिवसेनेचे विचार पुढे घेऊन जात असल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कायम लोकसंख्या नियंत्रणावर बोलायचे, असं संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

मोदी सरकारच्या शिवसेनेच्या विचारांना अनुमोदन देताना दिसत आहे. हे राष्ट्रहितासाठी गरजेचे आहे. तिहेरी तलाक विरोधी विधेयक हे समान नागरी कायद्याच्या दिशेने टाकण्यात आलेले पाऊल आहे, असंही  संजय राऊत म्हणाले आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते.

राष्ट्रहिताच्या मुद्द्यांमध्ये धर्माला आणण्याची गरज नाही. देशात एखाद्या राज्याची केंद्रापेक्षा वेगळी ताकद कशी काय असू शकते, असं कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-रवी शास्त्रींची पुन्हा एकदा भारताच्या प्रशिक्षकपदी निवड!

-“महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट तरीही मुंबई दर पावसाळ्यात तुंबते”

-सैफने केलं स्मिता तांबेच्या अभिनयाचं कौतुक; म्हणाला…

-भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी ही नावं चर्चेत; कोणाची लागणार वर्णी???

-इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ पुरस्कारानं सन्मान