‘संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईत या, अन्यथा…’; बंडखोर आमदारांना शिवसेनेचा इशारा

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी शिवसेनेविरोधातच मोठं बंड पुकारलं आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. पण आता शिवसेनेतील नाराज असलेले आणि इच्छुक असलेले आमदार सुद्धा शिंदेंना मिळत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. याआधी शिंदेंची नाराजी समोर आली होती.

शिंदेंच्या बंडामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना शेवटचा इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी किती आमदार आहेत याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशात शिवसेनेचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी रात्री काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना, ‘माझ्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार आहेत, असा दावा केला. 55 आमदारसंख्या असलेल्या शिवसेनेतील 40 आमदार शिंदे यांच्यासोबत खरोखरच असतील, तर शिवसेनेपुढे अभूतपूर्व असा राजकीय आणि तांत्रिक पेच निर्माण होईल, हे स्पष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शिवसैनिकांनो काळजी करू नका, हा बाळासाहेबांचा जिगरी दोस्त अजून म्हातारा झाला नाही” 

‘त्या’ दिवशी नेमकं असं काय झालं की शिंदेंनी डायरेक्ट सूरत गाठलं?, खरं कारण आलं समोर 

‘या’ आमदारानं उद्धव ठाकरेंना आधीच अलर्ट दिला होता!, आता तोही आमदार या फोटोत 

सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण 

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का; ‘शिवसेने’वर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व येणार?