मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडावर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. अशातच 8 मार्च रोजी आयकर विभागाने (Income tax department) राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

मुंबईसह (Mumbai) राज्यभर 26 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये राज्यातील शिवसेनेचा (shivsena) एक मोठा नेता आयकरच्या रडारवर असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई पुणे सांगली, रत्नागिरीत येथे छापे टाकले होते. दापोली येथे एका मोठ्या राजकीय नेत्याने 2017 साली मोठी जमीन खरेदी केली होती. 1 कोटीच्या बदल्यात ही जमीन देण्यात आली होती.

या 1 कोटींच्या व्यवहाराची नोंद 2019 मध्ये करण्यात आली. 2017 ते 2020 या दरम्यान या जमिनीवर मोठे आलीशान रिसॉर्ट बनवले गेले.

या नंतर ही जमीन अधिकृतरित्या त्या राजकीय नेत्याच्या नावे झाली. पण रिसॉर्ट पुर्ण झाल्यावर ही संपत्ती मुंबईतील एका केबल व्यावसायिकाला विकण्यात आली. पण फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेली. या रिसॉर्टवर 6 कोटी खर्च करण्यात आले होते. एका सरकारी अधिकाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यातही मोठी माहिती समोर आली.

या सरकारी अधिकाऱ्याने पुण्यात एक बंगला, एक फार्म हाऊस, तासगाव येथे मोठे फार्म हाऊस, सांगलीमध्ये 2 बंगले, तनिष्क व कॅरेट नावाचे हिऱ्यांच्या दागिन्यांचे शोरुम, व्यावसायिक गाळे, पुण्यात 5 फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, नवी मुंबईत जमीन, सांगली बारामती पुणे येथे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची संपत्ती अशी माया गोळा केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

नवाब मलिकांचा राजीनामा घेणार?, जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं… 

काळजी घ्या! गेल्या 8 दिवसात 8 पटीने वाढलाय कोरोना; WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

 31 मार्चच्या आधी ‘ही’ 5 कामं आटपून घ्या; नाहीतर मोठं नुकसान होईल

आर्चीचा फोटो पाहून परश्या दिवाना, अशी कमेंट केली की… झाले सगळेच सैराट

 नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी