नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…

सिंधुदुर्ग | राज्यभरात आज नगरपंचायतची मतमोजणी असून सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत (Kudal nagar panchayat election result)  शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

दापोली नगरपंचायत निवडणुकीत पालकमंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेल्या शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची सत्तेला मोठा विजय मिळाला आहे. रामदास कदम यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना-6, राष्ट्रवादी-8, अपक्ष -2 भाजप आणि फक्त एका जागेवर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

दरम्यान, दुसरीकडे कोकणातील आणखी एक प्रतिष्ठेची लढत असलेल्या दापोली नगरपंचायतीमध्येही शिवसेनेची सरशी होताना दिसत आहे. याठिकाणी आतापर्यंत 11 जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी 9 जागांवर शिवसेना तर 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

त्यामुळे दापोलीतल रामदास कदम विरुद्ध अनिल परब या वादात शिवसेनेची स्पष्टपणे सरशी होताना दिसत आहे. राज्यातील 105 नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत यापैकी सर्वाधिक 12 नगरपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. तर भाजप 11 नगरपंचायतींसह दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला! 

रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता 

वरूण धवनला मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

“मारणं आणि जीवे मारणं यातला फरक कळतो का?”