कोल्हापुरात वातावरण तापलं; शिवसेनेचे पराभूत पवार संभाजीराजेंवर संतापले

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला. या विजयावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला टोला लगावला होता.

वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही, अशी खरमरीत टीका संभाजीराजे छत्रपतींनी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्विट करत शिवसेनेवर केली. त्यांच्या याच टीकेला संजय पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. आता यावरून कोल्हापुरात वातावरण तापल्याचं दिसतंय.

जर वाघाचं कातडं पांघरुन वाघ होता येत नाही. तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी तुम्ही का गेला होतात? मला मतं द्या म्हणत तुम्हीच पाठिंब्यासाठी शिवेसेनेकडे गेला होतात. तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं, असं प्रत्युत्तर संजय पवारांनी संभाजीराजेंना दिलंय.

संभाजीराजेंचा बोलविता धना कुणीतरी वेगळाच आहे. सर्कशीतले वाघ वेगळे असतात आणि जंगलातले वाघ वेगळे असतात. छत्रपती म्हणून तुमचा कायमच आदर राखत आलोय, इथून पुढेही राखेन. पण कृपा करुन आपण शिवसेनेवर टीका करु नये, असं संजय पवार म्हणालेत.

मी निवडून येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी दगाफटका झाला. सेनेचा उमेदवार म्हणून नाही तर आपला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केला असता तर निकाल काही वेगळा लागला असता, असं ते म्हणाले.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा केली होती. तर शिवेसनेने त्यांना उमेदवारीसाठी शिवबंधनाची म्हणजेच शिवसेनाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. पण संभाजीराजे अपक्ष लढवण्यावर ठाम राहिले. यामुळे शिवसेनेने कोल्हापूरमधील पक्षाचे नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

निवडणूक आयोग राजकारण्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत! 

प्रकाश आमटे यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर 

बिटकॅाईनमध्ये गुंतवणूक केलेले देशोधडीला लागले, झटक्यात पोहोचला इतक्या रुपयांवर 

“राष्ट्रपती निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील” 

टेंशन वाढलं! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ, वाचा आजची आकडेवारी