मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. अशातच मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणावरुन विरोधी पक्षनेते सरकारवर निशाणा साधत आहेत.

मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणाचा तपास ‘एनआयए’व्दारा करण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. यावर शिवसेने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी केलेली मागणी फटकारत ‘एनआयए’कडंच तपास दिल्यानं मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणाचा तपास बाहेर येणार नसल्याचं, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात मुंबई पोलीस सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं. आता तर गृहमंत्र्यांनी मनसुख मृ.त्यूप्रकरणाचा तपास ‘एटीएस’कडे दिला अलसल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणी विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील, तर त्याचा तपास व्हायला पाहिजे. ही घटना दु.र्वेवी आहे. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आ.त्मह.त्या केली, याविषयी जनतेच्या मनात शंका आहे. या शंकेचं निरासरन झालं पाहिजे. पण त्यांच्या मृ.त्यूचं कोणीही भांडवल करु नये, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला.

राज्याचं अधिवेशन सुरु असतानाच एका महत्वाच्या प्रकरणातील साक्षीदाराचा संशयास्पद मृ.त्यू होणं, हे ध.क्कादायक आहे. त्यामुळं हे प्रकरण नक्की काय आहे?, हे बाहेर यायलाचं हवं. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे वि.रोधकांनी लगेचच सरकारवर आ.रोप करणं बरोबर नसल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

25 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश आंबानीच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडून आल्याने तपास यंत्रणा अर्लट झाली होती.  क्रा.ईम ब्रांचनं त्याचा तपास केला असता, आज सकाळी मुंब्र्यातल्या खाडीत त्या गाडीमालकाचा मृ.तदेह सापडला. गाडीमालकाचं नाव मनसुख हिरेन असं आहे.

दरम्यान, पत्रकारांनी संजय राऊत यांनी सचिन वाझेंवर होत असलेल्या आ.रोपांवर विचारले असता. त्यावर वाझेंच मला माहित नाही. पण मला असं वाटतं की एखाद्या अधिकाऱ्यावर बोलणं योग्य नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी वेळ मारुण नेली.

महत्वाच्या बातम्या-

पाठवणीवेळी खूप रडणं नवरीला पडलं महागात, घडली ‘ही’ ध.क्कादायक घटना

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा काय आहेत आजचे दर

“केंद्राची जबाबदारी नाकारुन भाजपने दिशाभूल करु नये”

महत्वाचा दुवा समजला जाणाऱ्या ‘या’ उड्डाणपुलाला शरद पवारांचं नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी

चित्रपटातील एका भूमिकेसाठी कंगनाला काय काय करावंं लागतंय…..