शिवसेनेचा लखलखता तारा निखळला; 25 वर्ष आमदारकी बजावणाऱ्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन

अहमदनगर | शिवसेनेचे माजी महसूल राज्यमंत्री अनिल राठोड यांचे आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. शिवसेनेमधून 25 वर्ष आमदार म्हणून निवडून येणाऱ्या राठोड यांच्या निधनाने राजकारणावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनिल राठोड यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अनिल राठोड यांच्या अशा या अचानक जाण्याने राठोड कुटुंबियांसह शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर शहर मतदारसंघातून 1990 ते 2014 या सलग पाच टर्ममध्ये ते आमदारपदी निवडून आले होते. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्यावर महसूल राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती.

दरम्यान, अनिल राठोड यांच्या पश्चात त्यांची पत्नी, कन्या, पुत्र आणि सून असा परिवार आहे. राठोड यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, राठोड यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या उपचारानंतर ‘या’ व्याधींना तोंड द्यावं लागू शकतं; जाणून घ्या

अखेर तो दिवस आला, अयोध्यानगरी सज्ज झाली; आज ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन

‘…नाहीतर अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील’; चीनची अमेरिकेला धमकी

…तेव्हा अमृता फडणवीसांना मुंबई असुरक्षित वाटली नाही का?; रेणुका शहाणेंची मिसेस फडणवीसांवर टीका

पुणे हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्यानेच कटर ने वार करत मुलीचं डोकं फोडलं