एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा; शिवसेनेचं टेंशन आणखी वाढलं

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झालाय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी किती आमदार आहेत याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशात शिवसेनेचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी रात्री काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना, ‘माझ्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार आहेत, असा दावा केला. 55 आमदारसंख्या असलेल्या शिवसेनेतील 40 आमदार शिंदे यांच्यासोबत खरोखरच असतील, तर शिवसेनेपुढे अभूतपूर्व असा राजकीय आणि तांत्रिक पेच निर्माण होईल, हे स्पष्ट आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एका फोटोत शिंदे मध्यभागी बसले आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला सेना आमदार बसले आहेत.

मागच्या रांगेत बरेच आमदार उभे आहेत. या फोटोत जवळपास 35 ते 40 आमदार आहेत. पक्षातून दोन तृतीयांश आमदार बाहेर पडल्यास त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्याचा भंग होत नाही.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थक आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा’; बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल 

‘अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारेच आता…’, संजय राऊतांची खोचक टीका 

’24 तासांत मी तुमच्यासाठी वाईट झालो का?’, एकनाथ शिंदेंचा सवाल

“21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?”, मनसेचा टोला

मोठी बातमी! एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार