“कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नाव बदला”

मुंबई | कोल्हापुरमधील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असं करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा योग्य सन्मान राखणं गरजेचं आहे. त्यांचं कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्या विषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शिवाजी महाराजच नव्हे तर राज्यातील सर्व आदरणीय महापुरूष आणि दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकिय योजना, कार्यक्रम आणि ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याची इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान,  महात्मा जोतिराव फुले, छत्रपती संभाजी महाराज असा योग्य तो उल्लेख करून त्यांचा गौरव करावा. यादृष्टीने संबंधीत विभागांनी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-