Top news पुणे महाराष्ट्र

अक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का!

पुणे |  निराधार-मनोरुग्णांची संस्था चालवणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी विविध राजकीय नेत्यांनी आपापली मतं मांडली. कुणी अक्षयच्या समर्थनार्थ उभं राहिलं तर कुणी काहीशी मवाळ भूमिका घेत आपली बाजू मांडली.  शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करत अक्षयला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

अक्षय बोऱ्हाडे या सामाजिक कार्यकर्त्यास परवा जी मारहाण झाली त्याचे सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. गेली दोन दिवस मी या घटनेची इत्यंभूत माहिती घेऊन अक्षय बोऱ्हाडे, सत्यशील शेरकर तसेच पोलीस प्रशासनाशी बोलून सर्व माहिती पडताळली. याप्रकरणी अक्षयची समक्ष भेट घेऊन त्याला पाठिंबा द्यावा यासाठी मला अनेकांनी फोन केले. परवा झालेल्या प्रकरणाबद्दल शिवसेना पक्षाचा उपनेता व संपर्कप्रमुख म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडे यास पाठिंबा जाहीर दर्शवत असल्याचं आढळरावांनी जाहीर केलं आहे.

होय, सत्यजीत शेरकर आणि मी आम्ही दोघेही समाजकारणात येण्यापूर्वीपासूनचे चांगले मित्र आहोत. शेरकर यांना मी जवळून ओळखतो. आणि असं असलं तरीही कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया तसेच फोन आले. माझी विनंती आहे की नाण्याची एकच बाजू ऐकून मत बनवण्यापेक्षा पोलीस खात्याला त्यांचं काम करू द्यावं आणि एकच बाजू ऐकून सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवावा, अशी बचावात्मक भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली होती. मात्र आढळरावांनी उघड-उघड कोल्हेंच्या विरोधी भूमिका घेतली आहे.

या संपूर्ण विषयावर मी अक्षयशी सविस्तर चर्चा केली असून व्यक्तिशः माझ्याकडून व शिवसेना पक्षाकडून काही मदत लागल्यास मी खंबीरपणे उभा आहे असे सांगून अक्षयला आश्वस्त केले आहे. निराधार व मनोरुग्ण व्यक्तींची अक्षय करीत असलेली सेवा मी गेली अनेक वर्षांपासून पहात आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊनच गेल्या 2 वर्षांपूर्वी मी संस्थापक-अध्यक्ष असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वार्षिक सभेत ‘श्री भैरवनाथ जीवन गौरव पुरस्काराने’ अक्षयला सन्मानित केले. यापूर्वीदेखील ज्या ज्या वेळी अक्षयला गरज पडली त्या त्या वेळी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सहकार्य करायला सांगितले हे अक्षयलाही चांगलेच माहित आहे, असं आढळराव म्हणाले.

अक्षयच्या आरोपानंतर विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अक्षयला पाठिंबा देत त्याला मारहाण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार

-संकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोना लढ्यासाठी लावला मोठा हातभार

-“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”

-मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प

-…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड