औरंगाबाद महाराष्ट्र

शरद पवारांनी माझं सरकार पाडलं, सर्वांना त्रास दिल्यानेच आज त्यांची अवस्था अशी!

लातूर |  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव निलंगेकर यांनी राष्ट्रवादीच्या पडझडीवर भाष्य केलं आहे. मी मुख्यमंत्री असताना माझं सरकार शरद पवारांनी पाडलं होतं. त्यामुळेच पवारांचे विश्वासू सहकारी त्यांची साथ सोडून सेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असं निलंगेकर यांनी म्हटलं आहे.

डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते अशोकराव निलंगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातल्या कटू-गोड अनुभवांना उजाळा दिला.

माझ्यासारख्या काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना पवारांमुळे राजकीय त्रास सहन करावा लागला. आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जी घरघर लागलीये कारण शरद पवारांची संघटनेवरची पकड कमी झाली असावी, असं निलंगेकर म्हणाले.

माझं सरकार राज्यात मजबूतपणे काम करत होतं. महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे प्रयत्न चालू होते. पण शरद पवारांनी याच भितीने माझ्याविरोधात कुठलेच ठोस पुरावे नसताना माझ्या मुलीच्या गुणवाढ प्रकरणात मला संगनमत करून मला अडकवण्यात आलं. याच प्रकरणी पवारांच्या दबावामुळेच मला राजीनामा द्यावा लागला, असा सनसनाटी आरोप निलंगेकरांनी केला.

शरद पवार काँग्रेस सोडून गेल्यानंतर माझ्यासह जो त्रास काँग्रेसच्या नेत्यांना झाला तोच त्रास आज पवारांना होत असावा, असंही ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार आज जर काँग्रेसमध्ये असते तर काँग्रेस पक्षाची जशी आज वाताहात होतीये तशी झाली नसती, असं सांगायला देखील निलंगेकर यावेळी विसरले नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

-नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!

-ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणतात; वेळ बदलते म्हणून ‘घड्याळ’ थांबत नाही…!

-शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी युवक’वर सोपवली ही मोठी जबाबदारी!

-नगरची जागा न सोडणं अंगलट; राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यात विखेंचा मोठा वाटा

-होय… खेकडे धरण फोडू शकतात!- आदित्य ठाकरे

IMPIMP