पुणे महाराष्ट्र

“रुसलीस का रागानं??? 300 बॅनर लावलेत वाघानं”; शिवडीचा तो पठ्ठ्या अखेर सापडला!

पिंपळे सौदागर येथील बॅनर प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. ‘Shivade I am Sorry’ असे लिहिलेले तब्बल 300 बॅनर या पठ्ठानं लावले होते. हा पठ्ठ्या अखेर पोलिसांना सापडला आहे. प्रेम प्रकरणातून ही बॅनरबाजी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

निलेश खेडेकर असं या प्रियकराचं नाव असून तो पुण्याचा आहे. त्याने मित्र आदित्य शिंदेला Shivade I am Sorry नावाचे फलक लावायला सांगितले होते.

आदित्यने छोटे आणि मोठे असे 300 फलक लावल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. याप्रकरणी विनापरवाना फलक लावल्या प्रकरणी दोघांना 72 हजार रुपयांचा दंड बसू शकतो.

वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने त्याने हे फलक लावले होते, असं कळतंय.

बॅनरचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे बॅनर कोणी लावले, ही ‘शिवडी’ कोण आहे, यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. आता याचं कोडं सुटलं आहे.

IMPIMP