गड किल्ल्यांचे जतन करणं गरजेचं- शिवेंद्रराजे भोसले

मुंबई : महाराष्ट्रातील 25 ऐतिहासिक किल्ल्याचं हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी ने 25 किल्ल्यांची निवड केलेली आहे. त्यावर अनेकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच आता भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

गड किल्ल्यांचे जतन करणं गरजेचं आहे. आपला इतिहास काय हे पुढच्या पिढीला कायम लक्षात राहावा यासाठी गडकिल्ल्यांचं जतन झालं पाहिजे, असं शिवेंद्रराजे म्हणााले आहेत. 

महाराष्ट्रातील लोकांच्या भावनांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे, असंही शिवेंद्रराजे म्हणाले आहेत. सरकारच्या या निर्णयावरुन सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. 

गडांचे जतन-संवर्धन केले तर संपूर्ण जगभरातून हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी लोक येतील यातून स्थानिकांना रोजगार मिळेलच पण त्याचबरोबर समृद्ध वारसा जपण्याचे समाधान सुध्दा मिळेल, असं म्हणत संभाजींनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. 

गड- किल्ले फक्त हॉटेलच नाही तर लग्नसमारंभ आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मावळ्यांनी बलिदान दिलं ते किल्ले भाड्याने देण्यासाठी का? जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं अशी टीका अमोल कोल्हेंनी केली आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हीडिओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-