भाजपमध्ये जाताच दोन्ही राजांचं मनोमिलन?; शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट

सातारा | भाजपमध्ये जाताच सातारच्या दोन्ही राजांमधील वाद मिटला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शिवेंद्रराजे यांनी चक्क उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय.

राष्ट्रवादीत असताना उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद टोकाला गेला होता. याच वादातून शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमध्ये प्रवेश करताच दोन्ही राजांच्या नात्याला नवं वळण मिळालंय की काय अशी घटना दोघांच्या भेटीच्या निमित्ताने समोर आली आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत नुकताच दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

71402676 2463698500539053 5932272991751634944 n

महत्वाच्या बातम्या-