जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!

मुंबई |  राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले साताऱ्याच्या जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या टीकेला शिवेंद्रराजे भोसले यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे.

एवढ्या दिवस मी राष्ट्रवादीत होतो, तोपर्यंत आव्हाडांना माझा छत्रपतींचा वारसा दिसला नाही. काल भाजपात गेलो की त्यांना माझा वारसा दिसला काय? आव्हाडांनी मला माझा वारसा सांगू नये… राजकारणात मी जे काही मिळवलंय ते संघर्षातून मिळवलंय, अशा शब्दात त्यांनी आव्हाडांना उत्तर दिलं आहे.

शिवेंद्रराजे जो वारसा सांगतात, त्या आमच्या छत्रपती शिवरायांनी 16 मावळे घेऊन तोरणा किल्ला जिंकला होता. प्रवाहाच्या विरूद्ध पोहणारेच विजयी होतात आणि काहीतरी करून दाखवतात. गेले त्यांना जाऊ द्या.. आम्ही पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता मिळवून देऊ, असं आव्हाड म्हणाले होते.

शिवेंद्रराजेंनी मतदारसंघाच्या विकासाचं कारण देत पक्ष सोडला. त्यांना एवढीच मतदारसंघाची काळजी होती तर इथून पाठीमागे त्यांनी विधानसभेत मतदारसंघाबाबतचे किती प्रश्न उपस्थित केले, हे साताऱ्यात सांगावं, मी त्यांचे पाय धरून माफी मागतो, असंही आव्हाड म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील पक्षांतरावर आणि नेत्यांच्या सोडचिठ्ठीवर जुजबी भाष्य करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“शरद पवार हृदयात आहेत असं म्हणणाऱ्यांचं हृदय मला चेक करावं लागेल”

-शरद पवारांनी माझं सरकार पाडलं, सर्वांना त्रास दिल्यानेच आज त्यांची अवस्था अशी!

-नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!

-ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणतात; वेळ बदलते म्हणून ‘घड्याळ’ थांबत नाही…!

-शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी युवक’वर सोपवली ही मोठी जबाबदारी!