साताऱ्यातून ‘हा’ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवेल; अजित पवारांनी जाहीर केलं नाव

सातारा |  साताऱ्यातून विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसलेच पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. ते साताऱ्यात बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवारांंच्या निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणं चालू केलं आहे. आज अजित पवार सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या मात्र शिवेंद्रराजे या बैठकीस अनुपस्थितीत राहिल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

कोणताही तर्क वितर्क लावण्याचं काही कारण नाही. मीसुद्धा बारामती मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी अर्ज केला नाही. मग याचा अर्थ असा लावायचा का… मी निवडणूक लढणार नाही. कामात व्यस्त असल्या कारणाने अर्ज भरायचा राहून गेला. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसलेच पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असं अजित पवार म्हणाले.

ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यमान आमदार इच्छुक आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले.

शिवेंद्रराजे भोसले अजिंक्यतारा कारखान्यावरील एका महत्वाच्या बैठकीत व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत, असं सांगितलं जातंय. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रराजे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवार यांनी या चर्चांना आज पूर्णविराम दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार माझ्या ह्रदयात असतील तर उद्धव आणि आदित्य यांचं बळ अंगात असेल- सचिन अहिर

-मी काटे मोडत नाही तर, फक्त घड्याळाला चावी देतो- उद्धव ठाकरे

-सचिन अहिरांनी ‘राम राम’ करताच राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड!

-शिवसेनेने पडणारा नेता नेला- नवाब मलिक

-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला धक्का; हा आमदार भाजपच्या गळाला??