महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली???; शिवेंद्रराजे भोसले म्हणतात…

मुंबई |  साताऱ्याच्या जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मरगळ आली आहे. सत्तेपासून दूर राहता येत नाही. आरक्षणाच्या निर्णयामुळे तरूण मराठा समाज भाजपसोबत आहे, असं स्पष्टीकरण देत शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

साताऱ्याचे खासदार उदयनराजेंशी असलेल्या वादामुळे शिवेंद्रराजे चांगलेच चर्चेत असायचे. मात्र पक्ष सोडताना त्यांनी माझ्यात आणि उदयनराजे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. उदयनराजे हे मोठे बंधू आहेत. ते भविष्यात कायम माझ्यासोबत असतील, असं म्हटलंय.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी पसरली आहे. भाजपला जनाधार वाढतो आहे. त्यामुळेच मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: शिवेंद्रराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतू पवारांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शिवेंद्रराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक मताने त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला.

दरम्यान, शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीला एका-पाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘राष्ट्रवादी’ला सर्वात मोठा धक्का; साताऱ्यातील राजांचा राजीनामा

-पुढच्या 15 वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही- चंद्रकांत पाटील

-शिवेंद्रराजेंनी पवारांना अव्हेरलं; आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, उद्या भाजपत प्रवेश!

-फोडाफोडीच्या राजकारणानंतरही शरद पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर

-‘दिव्यांग प्रवासी डब्या’तून गरोदर महिलाही प्रवास करु शकतात…; अमित ठाकरेंच्या मागणीला यश

IMPIMP